Home निधन वार्ता अशोक लक्ष्मण बांगडे यांचे निधन

अशोक लक्ष्मण बांगडे यांचे निधन

335

वरोरा : स्थानिक सरदार पटेल वॉर्ड येथील रहिवासी आणि ‘सिद्धकला हॉटेल’चे संचालक नितेश बांगडे यांचे वडील अशोक (बाबाराव) लक्ष्मण बांगडे यांचे आज, सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

.        बाबाराव बांगडे हे परिसरात मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने बांगडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता आनंदवण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!