Home चंद्रपुर जिल्हा विशेष बापरे ! शेतकऱ्याच्या अंगावर धावून आली भल्लीमोठी मगर

बापरे ! शेतकऱ्याच्या अंगावर धावून आली भल्लीमोठी मगर

397

आल्फरमध्ये 300 किलोची मगर जेरबंद

पाच तासाच्या थरारक रेस्क्यूनंतर जीवदान

“अपास” एनजीओ आणि वनविभागाची मोठी कारवाई

वरोरा : तालुक्यातील आल्फर येथे शेतालगतच्या ना ल्यात कामासाठी गेलेल्या नितेश तुरानकर यांच्यावर एका मगराने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभाग आणि ‘अपास’ एनजीओच्या पथकाने तब्बल पाच तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ८.७ फूट लांबीच्या आणि ३०० किलो वजनाच्या या मादी मगराला जेरबंद केले.

मगर घेऊन जाताना अपास संस्थेची चमू,

.     प्राप्त माहितीनुसार आल्फर येथील नितेश तुरानकर हे आपल्या शेतातील नाल्यापाशी गेले असता, दबा धरून बसलेली मगर अचानक त्यांच्या अंगावर धावून आली. प्रसंगावधान राखून त्यांनी आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना माहिती देण्यात आली.

.     माहिती मिळताच वरोरा वनविभाग आणि अपास एनजीओ’च्या रेस्क्यू टीमला पाचारण क रण्यात आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. मगर नाल्यातील पाण्यात असल्याने मगराला पकडण्यासाठी टीमला मोठी कसरत करावी लागली.

.     अखेर अत्यंत कौशल्याने सापळा रचून या महा काय मगराला जेरबंद करण्यात आले. या मोहिमेत अपास एनजीओचे विशाल मोरे, हर्षल बाकडे, विवेक मोरे, पंकज खाजोने, प्रशांत राऊत, अमित नन्नावरे, राहुल पानघाटे, शुभम भगत, श्रीपाद बाकडे, आशिष चहाकाटे यांच्यासह जितेंद्र लोणकर (शेगाव आर.ओ.), दिवाकर चांभारे (टेंमुर्डा आर.ओ.) व वनरक्षक हजारे यांनी सक्रिय सहभाग घेत मगराला जेरबंद केले.

‘चारगाव घरणात स्थानांतरण                                                                                                                                                             पकडण्यात आलेली मगर मादी जातीची असून तिचे वजन सुमारे 300 किलो तर लांबी 8.7 फूट आहे. सुरक्षितरीत्या रेस्क्यू केल्यानंतर या मगराला चारगाव धरणाच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अपास एनजीओने आतापर्यंत अशा प्रकारे 9 मगरांचे यशस्वीरीत्या स्थानांतरण करून वन्यजीव संवर्धनात मोठे योगदान दिले आहे.

“नाल्याकाठी किंवा तलावांजवळ पाणी वाढलेले असताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. वन्य प्राण्यांचा सामना झाल्यास त्यांना त्रास न देता तातडीने वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.”                                                                                                                                                                                         सतीश शेंडे (आरएफओ, वरोरा)

error: Content is protected !!