Home चंद्रपुर जिल्हा विशेष भद्रावतीत खळबळ उडवणारा ‘दणका’ !

भद्रावतीत खळबळ उडवणारा ‘दणका’ !

391

पोलीसांनी उद्ध्वस्त केले कोंबडा झुंजीचे दोन अड्डे

६.५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, ११ दुचाकी ताब्यात

अवैध व्यवसाय करणाऱ्यांची पाचावर धारण

भद्रावती : पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत येणाऱ्या मौजा गोरजा आणि मौजा बराझ मोकासा या शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर कोंबडा झुंजीच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी दोन ठिकाणी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, एकूण ₹६,५९,८३०/- (सहा लाख एकोणसाठ हजार आठशे तीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी गोरजा शिवारात सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला असता, तिथे जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात ३ कोंबडे, ४ मोटारसायकली, नगदी ३५०/-, एकूण किंमत ₹१,५६,३००/- तर दुसऱ्या कारवाईत, मौजा बराझ मोकासा शिवारातील जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २ जखमी कोंबडे, ७ मोटारसायकली, एकूण किंमत ५,०३,५३०/- व दोन्ही मिळून ६,५९,८३०/- (सहा लाख एकोणसाठ हजार आठशे तीस रुपये)  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

भद्रावती पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरात दहशत पसरली असून, पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती द्वारे केला जात आहे.

error: Content is protected !!