बिडीओ धनंजय साळवे यांचे प्रतिपादन
बाल सखिंना शालेय साहित्य वितरण
बल्लारपूर : सामाजिक जीवनात वंचित घटकांचा स्तर उंचावणे गरजेचे आहे. सामाजिक दायित्व विभाग ही जबाबदारी योग्य बजावतो. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील हा उपक्रम योग्य दिशा देणारा आहे. अप्रगत मुलांना प्रगत करण्याची जबाबदारी गौरवास्पद आहे. बिल्ट उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व विभागाचा विसापूर येथील उपक्रम प्रेरणादायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बिल्ट ग्राफिक पेपर प्रा.लि. व पहेल मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ६ ते १४ वयोगटातील अप्रगत मुलांना प्रगत करण्याच्या अनुषंगाने बाल सखींची नियुक्ती करण्यात आली. त्यांना शालेय साहित्य वितरण कार्यक्रम मंगळवार (दि. २0) जानेवारी ला घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिल्ट चे अधिकारी महेश दबा होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी धनंजय साळवे, बिल्टचे अधिकारी सुनील गोंतलवार, माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, विसापूरचे केंद्र प्रमुख नागेंद्र कुमरे, सुनिल नाकाडे, मधुकर भोयर, मुख्याध्यापक नरेंद्र वनकर, जि. प. हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, मुख्याध्यापक नंदूरकर, नामदेव शेडमाके यांची उपस्थिती होती.
. यावेळी मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. दरम्यान येथे नियुक्त दहा बाल सखींना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक भाषणातून पहेल मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालक मंजुषा काकडे यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन सुभम पारवे यांनी केले. आभार दिनेश भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाल सखी ऊषा पुंडे, विद्या झाडे, शितल कुक्कावार, वंशिका गिरसावळे, कल्याणी मुंजेकर, दीक्षा कोरेवार, सेजल गिरडकर, मधुशा शेडमाके, नेहा खोंडे, काजल मोरे यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.


