Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर शहरातील वाहतूक सिग्नल तात्काळ सुस्थितीत करा : खासदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर शहरातील वाहतूक सिग्नल तात्काळ सुस्थितीत करा : खासदार प्रतिभा धानोरकर

433

चंद्रपूर : शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा कोलमडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिग्नलवरील सर्व टायमर बंद ठेवले आहेत, तसेच महानगरपालिकेने सिग्नलमधील बिघाड दूर करण्यासाठी तात्काळ कोणताही पुढाकार न घेतल्यामुळे शहरात अनागोंदी माजली आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाला जाब विचारत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, आता संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने होत असलेल्या अपघातांची आणि सामान्य नागरिकांच्या गैरसोयीची गंभीर दखल घेतली आहे.

.        या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष केंद्रित करण्यात आले असून, संबंधित प्रशासकीय विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेला वाहतूक पोलीस विभाग आणि सिग्नलची देखभाल दुरुस्ती करणारी मनपा, या दोन्ही संस्थांनी जनतेला वेठीस धरले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणी केली आहे की, तत्काळ वाहतूक पोलिसांना बंद केलेले सर्व सिग्नल टायमर त्वरित सुरू करण्याचे आणि मनपा प्रशासनाला बिघाड झालेले सर्व सिग्नल युद्धपातळीवर दुरुस्त करून तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश देण्याचे त्यांनी सांगितले.

.       खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, ही किरकोळ समस्या नाही; ही थेट चंद्रपूरकरांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या विषयावर समन्वय साधून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करावी. नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी आणि वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास, या निष्क्रियतेबद्दल त्यांना सार्वजनिकरित्या जाब विचारला जाईल. असे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!