Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपुरात भाजपाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कांग्रेस कडून तिघींची दावेदारी

बल्लारपुरात भाजपाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कांग्रेस कडून तिघींची दावेदारी

510

नगरसेवक होण्यासाठी ६६ जणांनी मागितली उमेदवारी

उमेदवारी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष

अनेकश्वर मेश्राम
 बल्लारपूर : विधानसभा क्षेत्रातील व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका बल्लारपूर आहे. या नगरपालिकेची मतदारांची संख्या ८3 हजार ८00 असून मतदार असून येत्या २ डिसेंबरला सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. थेट नगराध्यक्ष निवड मतदार करणार आहे. भाजपाचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व येथे आहे. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला असे आहे.

.      बल्लारपूर नगरपालिकेत भाजपाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कांग्रेस पक्षाकडून तिघींनी दावेदारी पुढे केल्याची माहिती आहे. त्याच प्रमाणे १७ प्रभागातून 34नगरसेवकांसाठी तब्बल ६६ जणांनी उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष सुरु केला आहे.
बल्लारपूर नगरपालिकेची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून आहे. तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. यामुळे राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी भावी नगराध्यक्ष व नगरसेवक उत्साही झाले आहे. येथे मुख्य लढत भाजपा व कांग्रेस पक्षात आजतागायत होत आहे. यामुळे या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष मोठा आहे.चंद्रपूर येथे शुक्रवारी कांग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये बल्लारपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष पदासाठी दोघी डाक्टर पत्नी व एका गृहिणीने जिल्हा निवड मंडळाकडे अध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. यामध्ये चैताली दीपक मुलचंदानी, मिनाक्षी सुनील कुल्दीवार (कन्नमवार) व अलका अनील वाढई यांचा समावेश आहे.

.       एकेकाळी बल्लारपूर नगरपालिका कांग्रेसचा बालेकिल्ला होता. ७0 वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक वेळा कांग्रेसची सत्ता होती. मात्र दशकानंतर कांग्रेसच्या वर्चस्वाला भाजपाने सुरूंग लावला. कांग्रेसचे आपसी मतभेद याला कारणीभूत आहे. आता मात्र कांग्रेस आपली स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. नव्या दमाचे नेतृत्व पुढे येत आहे. या नगरपालिकेत भाजपाची दारोमदार माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. त्यांना सहकार्य भाजपाचे जेष्ठ नेते व वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचे लाभत आहे. पक्ष पातळीवर केंद्र व राज्यात सत्ता असल्याने संघटन मजबूत आहे. भाजपाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुल्दीवार यांनी प्रयत्न चालविला आहे.

अध्यक्ष पदाच्या खर्चाची ११ लाख २५ हजार मर्यादा                                                                                                                           बल्लारपूर नगरपालिका जिल्ह्यात सर्वात मोठी असून ‘ब’ वर्गात आहे. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान अध्यक्ष पदाची निवडणूक थेट मतदारांतून होत आहे. यामुळे अध्यक्ष पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा ११ लाख २५ हजार रुपये इतकी निर्धारित केली आहे. त्याच प्रमाणे नगरसेवक पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारासाठी 3 लाख ५0 हजार रुपये निवडणूक दरम्यान खर्च करावे लागणार आहे. खर्च तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग खर्च मर्यादा ठरवून देते. मात्र निवडणुकीत उमेदवार खर्च मर्यादेच्या पलीकडे खर्च करण्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी कसे नियंत्रण ठेवते, हा औचित्याचा प्रश्न आहे.

error: Content is protected !!