आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
समाज बांधवांच्या उपस्थित पार पडले भूमीपूजन
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे विविध समाज बांधवांच्या सामाजिक, सांस्कृतिक व अन्य सामाजिक उपक्रम पार पाडण्यासाठी सभागृह आहेत. मात्र, तेली समाजातील बांधवांसाठी कोणतेही सभागृह नाही. ही बाब समाज बांधवांनी माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह केला. त्यांनी समाज बांधवांची गरज पूर्ण करण्यासाठी ४0 लक्ष रूपये मंजूर करून दिले. विसापूर येथील श्री. पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालय जवळ नियोजित तेली समाज सभागृहाचे भूमीपूजन शनिवार (दि. ८) नोव्हेंबर रोजी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आले.
. बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. येथे सर्व समाज घटकांना काही प्रमाणात सामाजिक, सांस्कृतिक व अन्य उपक्रम राबविण्यासाठी सभागृह आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने साकारण्यात आले आहे. आता संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने तेली समाज बांधवांनी ४0 लक्ष रूपये खर्चाचे सभागृह साकारणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी किशोर पंदीलवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून गावात विकासासाठी मोठे योगदान दिल्याची भावना व्यक्त केली.
. यावेळी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मंडळाचे पदाधिकारी विजय गिरडकर, अशोक गिरडकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर, सुरेखा ईटनकर, अश्विनी वैरागडे, कविता बावणे, नरेंद्र ईटनकर, शंकर गिरडकर, बंडू बावणे, रमेश बावणे, रामदास हरणे, प्रितम पाटणकर, आकाश गिरडकर, राजेंद्र बुटले यांच्या सह तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.


