Home चंद्रपुर जिल्हा विशेष ग्रामपंचायत श्रेत्रात डास प्रतिबंधक फवारणी तात्काळ करा : आशिष हनवते

ग्रामपंचायत श्रेत्रात डास प्रतिबंधक फवारणी तात्काळ करा : आशिष हनवते

510

डेंग्यू – मलेरियाचा वाढता धोका : नागरीक हैराण

भद्रावती : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा परिसरातील आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामूळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे. या वाढत्या डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले असुन, डेंगु व मलेरिया सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत श्रेत्रातिल उघड्या नाल्या, गटारे, खुली भूखंड, बांधकामाच्या ठिकाणांवरील पाणी साठवण टाक्या तसेच शेतजमीनीमध्ये पाणी साचल्याने डासांची प्रचंड वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत डासांचा त्रास वाढत असुन, घराघरात डासांचे थवे दिसत आहेत. या पाश्र्वभूमीवर शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तात्काळ डास प्रतिबंधक फवारणी व धूर फवारणी (फाॅगिग) शुद्ध पाणी पुरवठा नियमित तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

.      आशिष हनवते यांनी ग्रामपंचायत ग्रामसेवकास तसेच प्रशासक व सरपंच यांच्याशी संपर्क साधून परिसरातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती तत्परता प्रशासनाने दाखवावी. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!