Home चंद्रपुर जिल्हा विशेष परसोडा येथे प्रवासी निवारा उभारा

परसोडा येथे प्रवासी निवारा उभारा

565

शुभम आमने यांचे आ. देवतळे यांना निवेदन

बस थांबा असूनही प्रवाशांना उन्हात-पावसात थांबावे लागते

वरोरा : तालुक्यातील परसोडा येथे बस थांबा असून देखील प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.

.      खैरगाव आणि परसोडा या दोन गावांचा एकच बस थांबा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी थांबतात. वरोरा-चिमूर महामार्गाचे काम सुरू होताना या ठिकाणी असलेला जुना प्रवासी निवारा पाडण्यात आला. मात्र काम पूर्ण होऊनही तो अद्याप पुन्हा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिक, विद्यार्थी व प्रवासी यांना उन्हात, पावसात रस्त्याच्या कडेला उभं राहून बसची वाट पाहावी लागते.

.      या गंभीर समस्येची दखल घेत परसोडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांनी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देत प्रवासी निवारा बांधण्याची विंनती केली आहे.

.     या निवेदनाद्वारे शुभम आमने यांनी विद्यार्थी, वृद्ध व इतर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या ठिकाणी प्रवाशांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.

error: Content is protected !!