Home चंद्रपुर जिल्हा विशेष नवीन रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

नवीन रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

665

जनसुनावणीत नांदगाव (पोडे) येथील ग्रामस्थांचा आक्रोश

बल्लारपूर उपविभागीय कार्यालयात होती जनसुनावणी

बल्लारपूर : रेल्वे प्रशासनाने बाबुपेठ ते सास्ती दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. याबाबत बल्लारपूर उपविभागीय कार्यालयात आज गुरूवार दिनांक २८ रोजी जनसुनावणी आयोजित केली. यामध्ये नांदगाव ( पोडे ) येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी जोरदार प्रतीकार केला. उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांना निवेदनाद्वारे नवीन रेल्वे मार्गाला प्रचंड विरोध केला.

.        रेल्वे प्रशासनाने बाबुपेठ ते सास्ती दरम्यान नवीन रेल्वे मार्ग करण्यासाठी रेल्वे अधिनियम १९८९, रेल्वे (सुधारणा) अधिनियम २00८ अन्वये सक्षम भुसपांदन प्राधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने बल्लारपूर येथे जनसुनावणी आयोजित केली. यावेळी नांदगाव (पोडे) येथील ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा व जनप्रतिनीधींचा समावेश होता. यामध्ये बाबुपेठ ते सास्ती दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला विरोध करण्यात आला.

.     दरम्यान रेल्वे चे अभियंता नवीन शर्मा, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, वेकोलिचे क्षेत्र नियोजन अधिकारी अविनाश तळवलकर यांनी शेतकऱ्यांना रेल्वे मार्गाबाबत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे मार्गामुळे कृषी क्षेत्राची विभागणी होण्याचा धोका असल्याच्या भूमिकेवर शेतकरी अडून होते. हा प्रकल्प शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा असल्याचा आरोप केला. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा दिला.

.       यावेळी नांदगाव (पोडे) येथील सरपंच वनिता वैद्य, उपसरपंच मल्लेश कोडारी, सुनील खापने, स्वराज्य शेतकरी संघटनेचे सूर्या अडबाले, गणेश आमणे, देनानंद शेंडे, शैलेश लांबट, गौरव पोडे, लक्ष्मण पोडे, मनोहर पोडे, यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!