वरोरा : धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲड. अनिलकुमार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरोरा तालुकाध्यक्ष कमलाकर पडवे यांच्या सूचनेनुसार व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय बोधे यांच्या सहकार्याने वरोरा तालुका धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या महासचिवपदी महेश लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली.
. यावेळी संजय काळे, प्रशांत उरकुडे यांसह अन्य सभासद उपस्थित होते. नव्या महासचिवांना संघटनेच्या भावी उपक्रमांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्ती कार्यक्रमात पडवे यांनी सर्वांचे आभार मानले.


