वरोरा : महात्मा गांधी तंटामुक्ती समिती संसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा व वीरांगना मुक्ताई पुरुष स्वयंमसाहता शेतकरी बचत गट चरुर धारापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदीबैल तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन समाजभवन येथे पार पडले.
. कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य मारोतीभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र रणदिवे, तंटामुक्ती सदस्य सिंगलदीप पेंदाम, पोलिस पाटील दुर्गाताई केदार, ग्रामपंचायत सदस्या आशाताई नन्नावरे, अंगणवाडी सेविका सुषमाताई घरत, आशा वर्कर सीमाताई केदार, शा.व्य.स. अध्यक्ष राजूभाऊ ऊरकांडे, तंटामुक्ती सदस्य शारदा ऊरकांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
. स्पर्धेत एकूण २४ बालस्पर्धक सहभागी झाले. दिव्यांशू केदार (प्रथम), खुशी चौधरी (द्वितीय) व पृथ्वीक नन्नावरे (तृतीय) यांना पारितोषिके देण्यात आली. सर्व स्पर्धकांना शालेय साहित्य, खाऊ व उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
. नवनिर्मिती गुरुदेव भजन मंडळ चरुर धारापुरे यांच्या भजनांनी कार्यक्रम रंगतदार झाला. पालक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.


