Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपुरात स्मार्ट मिटरला कांग्रेसचा विरोध

बल्लारपुरात स्मार्ट मिटरला कांग्रेसचा विरोध

719

शहर काँग्रेसचे विज वितरणला निवेदन

विज देयक दुप्पट येण्याची धास्ती

बल्लारपुर : घरगुती वीज ग्राहकांना जुण्या मिटर नुसार वीज देयक दिल्या जात आहे. मात्र वीज वितरण कंपनीमार्फत स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे वीज ग्राहकांना दुप्पट देयक येण्याची धास्ती आहे. बल्लारपूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मिटर लावण्याला विरोध केला आहे. याबाबत शुक्रवार (दि. १) आगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कातकर यांना निवेदन सादर करुन संताप व्यक्त केला.

.       बल्लारपूर शहरात मागील काही दिवसापासून विज ग्राहकांचे जुणे मिटर काढले जात आहे. त्याठिकाणी स्मार्ट मिटर लावले जात आहे. जुणे मिटर योग्य असताना स्मार्ट लावण्याची काय गरज आहे. यामुळे वीज ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुरु कली. त्या वीज ग्राहकांना देयक दुप्पट होत आहे. याचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे.

.      स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया सुरु करणारे कंत्राटदार वीज ग्राहकांवर दडपण आणत आहे. ही विज ग्राहकांवर जबरदस्ती आहे. विज वितरण कंपनीने हा प्रकार त्वरित थांबवावा, असे निवेदन बल्लारपूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कातकर यांना सादर करून स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया बंद करावी, असे म्हटले आहे.

.    निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव घनश्याम मुलचंदानी, शहर अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुल्दीवार, नरेश मुदंडा, सुनंदा आत्राम, नरसिंह रेब्बावार, प्राणेश अमराज, मेहमुद पठाण, कासिम शेख, मंगेश बावणे, नरेश आनंद, नरेश बुरांडे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

error: Content is protected !!