Home सामाजिक छञपती शिवाजी महाराज महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

छञपती शिवाजी महाराज महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

978

वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सूर्ला वरोरा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

.        या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सनय बहूउद्देशीय संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष सुधाकर खरवडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिनकर गुरनूले, प्रा. दिपक खामनकर, प्रा. मनोज खांडारकर, प्रा. भारती पाटील, प्रा. निकिता कापसे व अनेक शिक्षकांची उपस्थित होती.

.       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिया सलामे तर आभार प्रदर्शन निकिता श्रीरामे हिने केले. तसेच तुषार कडू, हर्षद ढवस, रमेश जीवतोडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

error: Content is protected !!