महसूल विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
वरोरा : अवैध रेती साठा व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या रेती माफिया विरुद्ध वरोरा महसूल विभाग सज्ज झाला असून भरारी पथकाच्या माध्यमातून दररोज कारवाई केल्या जात आहे. दि. 16 रोजी अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करून दि. 18 मे रोजी 60 ब्रास अवैध रेतीच्या साठ्यावर कारवाई करण्यात आल्याने रेती माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
![]()
. अवैध गौण खनिज विरोधात तयार करण्यात आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला दिनांक 16 मे रोजी वरोरा शहरातून एका ट्रक मध्ये अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे निर्देशनात आले. सदर ट्रकला थांबवून ट्रक मध्ये असलेल्या रेतीबाबत विचारणा केली असता ट्रक चालकाकडे रेतीचा परवाना नसल्याने ट्रकमध्ये असलेल्या दीड ब्रास रेसी व ट्रक वर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलमानुसार कारवाई करून उचित दंड व शास्ती रक्कम वसुली करण्यात आली आहे. तर दिनांक 18 मे रोजी मौजा वरोरा येथील टिपले बोडी येथे अंदाजे ५० ते ६० ब्रास अवैध रेती साठा आढळून आला असून त्या साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
. सदर रेती साठा जप्त करून घरकुल लाभार्थी यांना मोफत वाटप करण्यासाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्याची कारवाई सुरू आहे. सदर कार्यवाही तहसील कार्यालय पथक द्वारे नायब तहसीलदार उल्हास लोखंडे वरोरा यांचे मार्गदर्शनात तलाठी श्रद्धा जिल्हेकर वरोरा, तलाठी स्वप्निल तिकुडवे वनोजा, तलाठी पवन चिंचुलकर सोईट यांनी अवैध रेती साठा जप्तीची कार्यवाही पार पाडली.


