Home सामाजिक गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा पूर्ववत सुरू

गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा पूर्ववत सुरू

866

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश

चंद्रपूर : गडचांदूरवरून पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा-गडचांदूर-येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना गडचांदूर येथे रस्त्यावर रात्र काढावी लागत होती. या गंभीर समस्येची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, चंद्रपूर यांच्याकडे पाठपुरावा करताच गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

.       जिवती येथे नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी गडचांदूर-नगराळा-येल्लापूर-जिवती बस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आली याची तातडीने दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला त्यांनी गडचांदूर-नगराळा-येल्लापूर-जिवती ही महत्त्वपूर्ण बस सेवा तसेच गडचांदूर येथून जिवती मार्गे धावणाऱ्या सर्व बंद बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी त्वरित कार्यवाही करत बंद असलेली गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू केली आहे. यामुळे आता या मार्गावरील शेकडो प्रवाशांना पूर्वीप्रमाणे एसटी बसचा मोठा आधार मिळाला आहे.

error: Content is protected !!