चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसात सहा महिलांचा बळी
मदनापूर बीटातील करबडा येथील घटना
पती समोरच वाघाने नेले पत्नीला उचलून
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग चवथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्र मधील करबडा येथील रोपवनात कक्ष क्र ८६२ मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या कचराबाई अरुण भरडे (५४) या महिलेवर वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. बुधवारी सकाळी 9 वाजता दरम्यान घटना उघडकीस आली आहे.चार दिवसात वाघाने सहा महिललाचा बळी. घेतला आहे
. वाघाची दहशत व भिती सर्वत्र आहे. मागील चार पाच दिवसापासून वाघ कुमराज चौधरी यांच्या शेतातील टाक्यात पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात.कचराबाई आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या रोपवनात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती.यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला तेव्हा महिलां ओरडली तेव्हा ओरडण्याचा आवाजाकडे तिच्या पतीचे लक्ष गेले असता चक्क वाघाने त्या महिलेल्या तोंडात पकडून फरफटत नेत असताना बघीलते आणि गावात जाउन नागरिकांना या घटनेची माहिती दिली माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचरा बाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.
. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा, गावाभोवताल तारचे कुंपण करा, मुलाला नौकरी द्या, अश्या मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचला अन्यथा उचलू नका असा आक्रमक पवित्रा मयत महिलांचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र वनविभाग व पोलीस विभागाणी पूर्ण माहिती देत आक्रमक झालेल्या नागरिकांना शांत करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम, वनपाल विनोद किलनाके, अमोल कवासे, जरारे वनरक्षक, मेश्राम, नागलोत, जिवतोडे, गेडाम, खारडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सहकायक पोलीस निरीक्षक दीप्ती मडकाम, पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते.
मयत कुटुंबास दिली वनविभागाने आर्थिक मदत वनविभागाच्या वतीने मयत भरडे कुटुंबास पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली असून उर्वरित शासन नियमानुसार मदत देण्यात येणार आहे.


