नागभीड : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून टीचर्स करिअर एज्युकेशन सोसायटी कोटगांव द्वारा संचालित कृषक विद्यालय कोटगांवचा निकाल 81.63 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.
. या विद्यालयाची आरती योगराज पिसे हिने 89.20 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तर साहिल देवानंद बिलोने याने 85.60 टक्के गुण मिळवीत दुसरा व तर साहिल रवींद्र थोटे यांनी 84.40 टक्के गुण प्राप्त करीत तिसरा आला. ऋषिकेश दिलीप मेंढे 78.60 टक्के, आकांक्षा ज्ञानेश्वर घोडमारे व आर्यन संभाजी निमगडे यांनी 76.60% गुण घेऊन पाचवा क्रमांक प्राप्त केला.
. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे टीचर्स करिअर एज्युकेशन सोसायटी कोटगांवचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य व संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण पिसे व शिक्षक एन.एल. ठाकरे, एम. पी. मंदे, आर. पी. इरपाते, डी. डी. सुकारे, पी. एन.बरसागडे, आर. एम. चंदनखेडे, बी. एन. गोडे, शिक्षकेतर कर्मचारी एस.व्ही. गिरमकर, पी.आर. रामटेके, एम. एन. कुंभरे यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


