तेंदूपत्ता वेचणाऱ्या 3 महिलांचा घेतला होता बळी
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना
वनविभागाला यश
महेंद्र कोवले
सिंदेवाही : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या तीन महिलावर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याची घटना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही तथा उपवनक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत मध्ये नुकतेच घडली. सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालयाने त्या हल्लेखोर वाघाची निश्चिती करून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
. सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत डोंगरगाव बिटातील कक्ष क्रमांक १३५५ मध्ये मेंढा माल येथील महिला तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघिणीने आणि तिच्या पिल्ल्याने महिलांवर जोरदार हल्ला केला. त्यामध्ये कांताबाई बुधाजी चौधरी (६५), सारिका शालिक शेंडे (४९), शुभांगी मनोज चौधरी (३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे यात सासू सुनेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आणि प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले.
. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप लाईव कॅमेरे लावून वाघाचा मागोवा घेत घटनेस जबाबदार असणाऱ्या वाघाची निश्चिती करून ब्रम्हपुरी वनविभाग भा व से राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव ब्रम्हपुरी विभाग एम. बी.चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलिस दल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अजय मराठे, बायोलाजिस्ट विभाग राकेश अहुजा, इत्यादी अधिकारी यांचे उपस्थितीत आणि मार्गदर्शनात डोंगरगाव कक्ष क्रमांक १३६० मध्ये सशस्त्र पोलिस दल अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत सदर वाघिणीला बेशुद्ध केले. आणि तिला जेरबंद करण्यात आले. पुढील उत्तरीय तपासणी सुरू असून घटनास्थळावर चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांनी भेट दिली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांचे नेतृत्वात क्षेत्रसहाय्यक एन. टी. गडपायले, क्षेत्र सहाय्यक नवरगाव एच.बी.उसेंडी, गुंजेवाही क्षेत्र सहाय्यक पी एस.मानकर, वनपाल के.डी.मसराम, वाय. एम. चौके, डी.आर. पेंदोर , वनरक्षक ओ. व्ही. चहांदे, तसेच सर्व पी आर. टी. चमू, वनमजूर यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
. सदर परिसरात घेतलेल्या मागोवा नुसार वाघिणीच्या पिल्लांचा शोध घेणे सुरू असून वाघास जेरबंद करण्याची मोहीम सुरूच असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी माध्यमांना दिली आहे.


