Home चंद्रपुर जिल्हा विशेष परसोडा ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

परसोडा ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

917

तहसीलदारांना सादर केले निवेदन

कोरपना : कोरपना तहसील अंतर्गत ग्रामपंचायत पर्सोडा येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ एकत्र येऊन मेसर्स आरसीसीपीएल सिमेंट कंपनी, मुकुटबन यांच्या विरोधात रस्ता बांधणी संदर्भातील ठोस मागण्यांसाठी २९ एप्रिल २०२५ रोजी कोरपना तहसीलदारांना निवेदन सादर केले.

.       निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, मौजा पर्सोडा परिसरात गौण खनिज उत्खननासाठी कंपनी पर्सोडा मार्गाचा वापर करत आहे. मात्र, कंपनीने फक्त पर्सोडा फाट्यापासून खाणेपर्यंत काही अंतरापर्यंतच रस्त्याचे बांधकाम केले आहे, तर उर्वरित सुमारे २.८ किमी मार्ग अत्यंत खराब अवस्थेत आहे आणि त्याचे कोणतेही बांधकाम अद्याप झालेले नाही. ग्रामपंचायतीने मागणी केली आहे की, या संपूर्ण मार्गाचे तातडीने बांधकाम करण्यात यावे. तसेच, CSR निधीतून पर्सोडा, पर्सोडा (नवीन), कोठोडा खु., रायपूर, गोविंदपूर या गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटने बांधकाम करण्यात यावे आणि नदीकाठावर संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात.

.      याशिवाय, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. लीज क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीने थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून खरेदी कराव्यात, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतीने मांडली आहे.जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ७ मे २०२५ रोजी पर्सोडा येथील खाणेजवळ खनन आणि वाहतूक बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

.       निवेदन सादर करताना तालुका काँग्रेस कमिटी कोरपना अध्यक्ष उत्तम पेचे, सरपंच गिरजा रामभाऊ कोहचाडे, उपसरपंच सतीश गोनलावार, सदस्य गणेश मडावी, शालिक दुर्लावार, संदीप मडावी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!