नेरी : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जाने 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात सार्श सरोज चौधरी नेरी याने 98.75% गुण घेऊन चंद्रपूर जिल्हयातून प्रथम येण्याचा षहुमान मिळविलेला आहे.
. ग्रामीण भागातील गुणवत्ता-धारक विद्यार्थ्यांसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने 1986 च्या राष्ट्रीय शैक्ष, धोरणानुसार प्रत्येक जिल्ल्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. दरवर्षी इयत्ता सहावी करिता सामाजिक आरक्षणानुसार ग्रामीण भागातील 70 टक्के व खुल्या विभागातून 25 टक्के असे एकुण 80 विद्यार्थी निवडले जातात. इयत्ता 6 वी (सत्र 2025-26) च्या प्रवेशाकरिता दि. 18 जाने. 2025 ला प्रवेश परिक्षा घेण्यात आली होती. अलिकडेच त्या परिक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे त्यात स्पर्श सरोज चौधरी राहणार नेरी याने सर्वाधिक 98.75 टक्के गुण मिळवून चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविलेला आहे. तर ओमखेत मैद (97.5 टक्के) व विहान मुसळे (96.25) अभिनव जाधव (96.25), मयंक भोयर (96.25) यांनी अनुक्रमे व्दितिय व तृतीय स्थान प्राप्त केलेले आहे.
. जवाहर नवोदय प्रवेश पात्र सर्व 80 विद्यार्थी, पालक मार्गदर्शक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे जिल्हाधिकारी विनय गोडा, शिक्षणाधिकारी (प्राथः) अश्विनी सोनावणे, डाएट प्राचार्य राजकुमार हिवारे सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तारधिकारी बोधाने विषयतज्ञ अरविंद आत्राम, दयाराम श्रीरामे यांनी कौतूक केले तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
केवळ परिक्षेसाठी अभ्यास न करता ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास करण्याचा सल्ला माझ्या आई-वडीलांनी मला दिला त्यानुसार मी अभ्यास केला. माझ्या यशाचे श्रेय माझे आईवडील, माझे गुरुजन, कुटूंबिय व मित्र परिवार यांना देतो. स्पर्श सरोज चौधरी, नेरी