Home सामाजिक कवठाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

कवठाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

863

आमदार देवराव भोंगळे यांचा हस्ते भुमिपुजन

कोरपना : तालुक्यातील मौजा कवठाळा येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (जि.प.) योजनेअंतर्गत मंजूर ४.२५ कोटी रुपयांच्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाचे आमदार देवराव भोंगळे यांचा हस्ते भुमिपुजन पार पडले

कवठाळा हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून मध्यभागी आहे. परीसरातील दहा ते बारा गावांना याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्याने आरोग्यविषयक फायदा होईल. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकरात – लवकर या आरोग्य केंद्राचे बांधकाम पुर्ण करावे. असे आमदार भोंगळे यावेळी म्हणाले. तर प्रथम आगमना निमित्त कवठाळा वासीयांनी आ. भोंगळे यांचे स्वागत व सत्कार केला.

.       यावेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, भाजपा तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, संजय चौधरी, सरपंचा रुपाली बोबडे, उपसरपंच गणेश रोगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंबे, संजय चौधरी, प्रणय अतकरे, पो. पा. मारोती राऊत, पुरुषोत्तम भोंगळे, बंडू जुनघरे, राहुल पायघन, प्रदीप राउत, वसंता बदखल, निखील भोंगळे, अशोक झाडे, देवराव ठावरी, सतीश चौधरी, गणेश मालेकर, रामदास कोल्हे, विजेता गेडाम व कुसुम संकुलवार यांचेसह मोठ्या प्रमाणावर ग्रामवासीय उपस्थित होते.

error: Content is protected !!