नागभीड : आपल्या जवानांनी दाखवलेली धैर्यशीलता, रणनीती आणी समर्पण हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे असून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 17 मे रोज सायंकाळी 4 वाजता जुना बस स्थानका पासून तिरंगा बाईक यात्रेला सुरुवात झाली.
. जूना बस स्थानक येथून मार्गक्रमण करीत सिनेमा टॉकीज चौक – गोवर्धन चौक -भगत सिंह चौक -शिवाजी चौक – बिक्केवार चौक -प्रियदर्शनी चौक- सावरकर चौक -संत गोरोबा चौक -राम मंदिर चौक येथे समारोप करण्यात आला. या ठिकानी सर्वांना शरबत वितरण करण्यात आले. बाईक यात्रेत मोठ्या प्रमाणात युवा तरुण महिला व पुरुष या सह विविध व्यापारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सेवाभावी संस्था सहभागी झाले होते. भारतीय सैन्याचा गौरव वाढविणाऱ्या घोषणा देण्यात आल्या तर पाकिस्तान व दहशतवाद विरोधी घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी यात्रेची सांगता झाल्यावर चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांनी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय नेतृत्वाचे आभार व्यक्त करीत भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे अभिनंदन करीत आम्ही सैन्याच्या आहोत आहोत व भारतीय सैन्याच्या कामागिरी वर आम्हाला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.
. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, नागभीड न.प. माजी नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, तालुकाध्यक्ष संतोष रडके, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा नेते संजय गजपुरे, प्रा.डॉ.अमीर धमाणी, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेश पठान, नागभीड चे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य देविदास चिलबुले, उपाध्यक्ष अजय काबरा, भाजप नेते जहांगीर कुरेशी, भाजपा जिल्हा महामंत्री प्रिया लांबट, भाजपा तालुकाध्यक्ष इंदु आंबोरकर, भाजप कार्यकर्त्या उर्मिला अमृतकर, योगिता पाथोडे, उज्वला भुरे, प्रियंका कोरे, स्नेहा कुर्झेकर, अनिता गिरीपुंजे, भाजपा नेते धनराज बावनकर, देवा बावनकर, जगदीश सडमाके, विजय ठाकरे, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, भाजप कार्यकर्ते रमेश ठाकरे, आरिफ बेग, पवन नागरे, राजू पिसे, हेमंत नन्नावरे, यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


