ब्रह्मपुरी : धम्म प्रचार केंद्र, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल तथा बौध्द समाज बांधव यांच्या वतीने ब्रम्हपुरी येथील धम्मभुमी येथे विविध उपक्रम राबवित बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
. यावेळी सकाळी धम्म ध्वजारोहण व बुध्द वंदना घेण्यात आली तसेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथून महाधम्म बाईक रॅली शहरातील संपूर्ण वॉर्डातून मार्गक्रम करीत धम्म भूमी येथे रॅली चे समारोप झाले. सायंकाळी धम्म भूमी येथील पटांगणात धम्म प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रेमलाल मेश्राम होते. तर प्रमुख वक्ते डॉ.विद्याधर बनसोड आंबेडकरी विचारवंत चंद्रपूर उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एम रामटेके यांनी केले तर सुत्र संचालन नरेश रामटेके, आभार प्रदर्शन यशवंत मेश्राम यांनी केले. यावेळी हजारोच्या संख्येने ब्रम्हापुरी शहरातील धम्म बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते.


