नागभीड : स्थानिक गोंडवन विकास संस्था नागभीड द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथील इयत्ता 10 वी व 12 वीच्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा स्व. वसंतराव कसबेकर सभागृहात नुकताच पार पडला.
. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंडवन विकास संस्थेचे सचिव रविंद्र जनवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका वर्षा जनवार, प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक युवराज इडपाचे मंचावर उपस्थित होते.
. बारावीच्या बोर्ड परीक्षेत कला शाखेतून 89 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आलेली ऋतुजा वलथरे , द्वितीय गणेश प सावसाकडे 78.50 टक्के तर 72.83 टक्के गुण प्राप्त करीत तृतीय आलेली प्राची रंधये यांचे व विज्ञान शाखेतून प्रथम सलोनी देशमाने, द्वितीय शिवम नैताम तर तृतीय प्रियंका खोब्रागडे यांचे त्याचप्रमाणे नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम ठरलेला आर्यसत्य डोंगरे, द्वितीय क्रिश मुनघाटे, 87.60 टक्के, तृतीय सम्यक उके 86.20टक्के, तन्वी आंबोरकर आणि होलिका नरुले या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव रविंद्र जनवार तसेच संस्थेच्या संचालिका वर्षा जनवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
. या अभिनंदन सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य देविदास चुलबुले यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार पर्यवेक्षक युवराज इरपाचे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील नवघडे यांनी केले. या समारंभास गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


