Home शैक्षणिक ६० वर्षांची सिंधू झाली मॅट्रिक पास !

६० वर्षांची सिंधू झाली मॅट्रिक पास !

1081

मजुरी, घरकाम करीत केली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण

पंकज रणदिवे
    नेरी : शिक्षण घ्यायला कुठलेही वयाचे बंधन नसते, तर शिक्षण मानवाच्या प्रगतीचे साधन आहे. परिस्थितीने व काही कारणाने शिक्षण घेता आले नाही. मात्र प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रेरणेने अनेक वर्षांच्या खंडानंतर तळोधी नाईक येथील ६० वर्षीय सिंधू सारयी या महिलेने राजीव गांधी विद्यालय मासळ येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत मजुरी, घरकाम व आशा वर्कर काम संभाळीत दहावीची परीक्षा पास करीत अनेक महिला-पुरुषांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

.       शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ ‘शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने पवित्र होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र, ते राष्ट्रीयतेचे, मानवतेचे नी अज्ञानमय दूर करण्याचे उदात्त कार्य आहे शिक्षणाविषयी, शिक्षणाची महती, थोरवी आणि शिक्षणात किती ताकद असते’, हे शिक्षणाविषयीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गौरवाद्गारावरून कळून येते.

.          चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथील ६० वर्षीय सिंधू सारयी या महिलेने अनेक वर्षांच्या खंडानंतर राजीव गांधी विद्यालय मासळ येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत 10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत सिद्ध करून दाखविले. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत चिमूर तालुक्यातील १२६ परीक्षार्थी पैकी १०४ परीक्षार्थी महिला चांगल्या गुणांनी पास झाल्या आहे. त्यात ७ महिला एटीकेटी मध्ये पास झाल्या आहेत. एकूण १११ महिला दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून मुली आणि महिलांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेकंड चान्स प्रोग्राम हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दरवर्षी राबविला जात असतो.

घरकाम, शेतकाम करून करीत होत्या महिला अभ्यास                                                                                                                          उपक्रमाध्ये सहभागी महिला घरातील आणि शेतातील कामे करून नियमित वर्गाला उपस्थित राहत होत्या. ज्या महिलांना कधी असे वाटले नसेल त्या महिलांना या उपक्रमातून शिक्षणाची एक संधी निर्माण झाली आणि त्या महिलांनी संधीचे सोने करून खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे वाक्य या महिलांनी खरे करून दाखवले आहे. उत्तीर्ण होऊन जिद्द आणि चिकाटीचे दर्शन समाजापुढे ठेवले आहे.

महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न                                                                                                                                        शिक्षणापासून वंचित असलेल्या पण शिकण्याची इच्छा असलेल्या महिलांचा सव्हें करून १७ नंबरचा फॉर्म भरून, नियमित त्याच्या गावात जाऊन संस्थेमार्फत वर्ग घेण्यात येत होते. यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य यांनी मेहनत घेऊन या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.                                                                                                                                                  योगेश खोब्रागडे,                                                        जिल्हा समन्वयक एस.सी.पी. चंद्रपूर.

error: Content is protected !!