Home शैक्षणिक स्वतः मोलमजुरी करत निशाने घेतले दहावीत 86 टक्के

स्वतः मोलमजुरी करत निशाने घेतले दहावीत 86 टक्के

1055

संघर्षातून यशाकडे वाटचाल

वरोरा : घरची परिस्थिती हलाकीची मात्र शिक्षण घेतले तरच परिस्थितीवर मात करू असा विस्वास बाळगत दुसऱ्याच्या घरी धुणी, भांडे करणारी वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा गावातील इंदिरानगर वसाहतीत राहणारी निशा प्रेमशंकर चव्हाण हिने दहावीच्या परीक्षेत 86 टक्के गुण प्राप्त करीत संघर्षातून यशाकडे वाटचाल केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

.        निशाचे वडिल नेहमी आजारी राहत असल्याने घराची जबाबदारी निशाच्या आईवर आली. घरात सात सदस्य आणि अठरा विश्व दारिद्र्य, शेत जमीन नाही तसेच आर्थिक स्त्रोत नाही. एकट्या आईच्या भरोशावर कुटुंबाचा राहाटगाडग चालत नसल्याने निशाने दहावीच वर्ष असतांनाही आईला मदत म्हणून आई सोबत धुनी भांडी करण्यासाठी जायची. अशाही परिस्थितीत निशाने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. पुस्तकांशी घट्ट मैत्री केली. आपल्याला शिकून मोठे व्हायचे आहे. आणि आपल्या आई वडीलाला आधार द्यायचा ही सप्ने उराशी बाळगून ट्युशनवर नव्हे, शिक्षकांवर विश्वास ठेऊन तिने दहाव्या वर्गात चांगल्या गुणांनी पास व्हायचे यासाठी ध्येयाचा पाठलाग केला. वर्गात शांत बसणे, शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे, अभ्यासाचा ध्यास, गृहपाठ पूर्ण करणे हे खरे तिच्या यशाचे गमक होते. कोणत्याही विषयाची शिकवणी वर्ग न लावता तिने विषयांनव्ये शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन दहावीच्या निकालात 86 टक्के गुण घेऊन नेत्रदीपक यश मिळविले आहे. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन मधून ती प्रथम आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, मुख्याध्यापिका विद्या गोखरे, आणि सर्व शिक्षकवृंदाना दिले आहे. सर्व शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदनीय सत्कार केला. महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, शाळा व्यवस्थापन कमेटीचे उपाध्यक्ष सुधाकर कडू, कोषाध्यक्ष सारिका सौसागडे व आदी कमिटी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!