वरोरा पोलीसाची मोठी कारवाही
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
चार जणांवर गुन्हे दाखल
वरोरा : महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी आहे. असे असतांना देखील छुप्या पद्धतीने सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक केली जात आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असून अनेकदा या विरोधात कारवाया देखील झाल्या आहेत. अशाच प्रकारे सुगंधित तंबाखूची एका कारमधून वाहतूक केली जात असल्याचे वरोरा पोलिसांना माहीत होतात नंदोरी टोल नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून अवैधरित्या सुगंधित तंबाखूची तस्करी करणार्या दोन जणांना ताब्यात घेतले. त्याचेकडून ९ लाख ६७ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
. महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे असे असले तरी महाराष्ट्रात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा तंबाखूची वाहतूक केली जात आहे. या विरोधात पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जात असताना देखील वाहतूक सुरूच आहे. दरम्यान मजा हा सुगंधित तंबाखू चा साठा नागपूर येथून चंद्रपूर कडे वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी.एफ.८९८२ या लाल रंगाच्या कार मध्ये आणला जात असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी तात्काळ नंदोरी टोल नाक्यावर नाकाबंदी केली. सदर कार येताच त्याला थांबवुन कारची झडती घेतली असता कार मध्ये २ लाख 67 हजार 600 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू मिळाला. सुगंधित तंबाखूची तस्करी करणार्या कार चालकाचे नाव मुकेश नगीनभाई कातरानी (४६) रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर व कारमध्ये बाजुला बसलेल्या महीलेचे नाव राणी मुकेश कातरानी (४०) रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर असे सांगीतले.
. सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखु ची वाहतुक करणे करिता वापरलेली लाल रंगाची DATSUN कंपनीची कार किमत ७ लाख रूपये असा एकुण ९, ६७,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची पोलिसांनी कसून विचारपुस केली असता, त्यांनी सदर प्रतिबंधीत तंबाखू हा आरोपी रक्षा ठक्कर, आशिष ठक्कर दोन्ही रा. दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर यांचे सांगणेवरून कार मध्ये दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर येथे आणणेकरिता सांगीतल्याने घेवून येत असल्याचे सांगीतले त्या आधारे आरोपी रक्षा ठक्कर व आशिष ठक्कर दोन्ही रा. दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर व मुकेश नगीनभाई कातरानी, राणी मुकेश कातरानी यांचे वरील आरोपीचे कृत्य कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) भारतीय न्याय संहीता सहकलम ३० (२), २६ (२) (अ), ३, ४, ५९ (आय) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा होत असल्याने सदर आरोपीं विरुद्ध विविध कलमान्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, पो.अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा दिलीप सुर यांनी केली.


