Home राजकीय नागभीड तालुका काँग्रेस कमेटीची आढावा बैठक संपन्न

नागभीड तालुका काँग्रेस कमेटीची आढावा बैठक संपन्न

937

नागभीड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्राताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देशनानुसार राज्यातील संघटक मजबुत करणेसाठी चंद्रपूर जिल्हा निरीक्षक आ.अभिजित वंजारी, व चंद्रपूर जिल्हा प्रभारी श्मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. अविनाश वारजूकर यांचे प्रमुख उपस्थितीत नागभीड तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली.

.      यावेळी आमदार अभिजित वंजारी यांनी काँग्रेस पक्ष कशाप्रकारे पूढे नेता येईल व येणाऱ्या ग्रा.पं असो वा नगरपरिषद, जि.प.निवडणूकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यावेळी मुजीब पठाण व आ.डाँ. अविनाश वारजूकर यांनी सुध्दा काँग्रेस पक्ष बळकट करणेसाठी मार्गदर्शन केले.

.     यावेळी चिमुर विधानसभा समन्वयक डाँ. सतिश वारजूकर, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, काँग्रेसचे जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे, प्रफुल खापर्डे, अँड. दिगांबर गुरपुडे, डाँ. प्रा. मोहन जगनाडे, डाँ. रविंद्र कावळे, विनोद बोरकर, तालुका काँग्रेस कमेटीचे सचिव शरद सोनवणे, पुरूषोत्तम बगमारे, विजय अम्रुतकर, प्रा. डाँ. संदिप सातव, विलास लांजेवार, प्रविण खोब्रागडे, अशोक वारजूकर, मधुकर बावणकर, राऊत, अमोल वानखेडे, वसमी छुकारिया, रविंद्र बळी, प्रशांत गेडाम, गोपाल म्हस्के, दिपक गिरिपुंजे, गजानन उरकुडे, भुपेश कोरे, चिमुर विधानसभा महिला काँग्रेस अध्यक्षा नितु गुरपुडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनिता डोईजड, माजी नगरसेवक नरेंद्र हेमणे, प्रतिक भसीन, माजी नगरसेविका आशा गायकवाड, माला मुळे, योगिता मिसार, शमा शेख, संजय माकोडे, अमोल बावणकर, कुणाल मुलमुले, संकेत वारजूकर, संजय मोहरकर, अमर नवघडे, मंगेश मेश्राम, संतोष सोनुले, मुन्ना राऊत, श्रीकृष्ण श्रिरामे तसेच काँगेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!