खाऊच्या आमिषाने नराधमाचे कृत्य
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक
चिमुरात तणाव : आरोपी अटकेत
नेरी : क्रांतीभूमी चिमूर शहरातील बेघर वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर त्याच वार्डात राहणाऱ्या दोन नराधमांनी काही दिवसा अगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रशीद रुस्तम शेख (56) व नसीर वजीर शेख (43) असे या दोन्ही नराधम आरोपीची नावे असून त्यांना अटक करण्यात आली. घटना माहित होताच जनमानसात संताप निर्माण झाला.
![]()
. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त जमावाने करत पोलीस ठाण्याला घेराव केला. तसेच दगडफेक केल्याने सोमवारी रात्री चिमूरमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामधे एक होमगार्ड व अन्य काही जण जखमी झाले आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला हलवण्यात आले आहे. यावेळी जमावाने टायर व इतर साहित्याची जाळपोळ देखील केली.
. पीडित मुलीचे आई-वडील रोजमजुरी करून परिवार चालवितात. पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेका शेजारी आहे. दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वॉर्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख (नडेवाला) यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचे आमिष दाखवून मार्च महिन्यात घरी बोलावून दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसीर वजीर शेख (गोलेवाला) यानेही खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार केला. हा प्रकार दोन्ही मुलीसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरु असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितले.
. चिमूर पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना माहिती होताच शेकडो नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले व आरोपीला फासीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत होते. घटनेचे गांभीर्य ओळखत ठाणेदार संतोष बाकल यांनी जास्तीची पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रनात आणली.
रात्रीच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल चिमूर शहरात झालेल्या घटनेची माहिती होताच व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू अतिरित पोलीस ताफ्यासह दाखल झाले. सध्या शहरात तणाव पूर्ण शांतता आहे.


