Home चंद्रपुर जिल्हा विशेष मोहफुले वेचणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

मोहफुले वेचणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

976

शिवणी वनपरिक्षेत्रातील मोहबोडी शिवारातील घटना

सिंदेवाही : सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असून वाघाचा धुमाकुळ सुद्धा सुरू आहे. अशातच बुधवारी सकाळी शिवणी वनपरिक्षेत्रा अंतर्गत  कुकडहेटी उपवन क्षेत्रातील मोहबोडी बीटात कक्ष क्रमांक २७१ मध्ये मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना (दि. 9) बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. भूमिता हरिदास पेंदाम (५८) राहणार कळमगाव तुकूम असे मृतक महिलेचे नाव आहे.

.     ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावात कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने येथील मजूर मोहफुले, तेंडुपत्ता, संकलन करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान बुधवारी कळमगाव (तुकूम) येथील काही महिला जवळच असलेल्या मोहबोडी येथील कक्ष क्रमांक २७१ मधील राखीव वनात मोहफुले संकलन करण्यासाठी गेले असता दुपारी साडे अकरा वाजताचे दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने भूमिता हरिदास पेंदाम या महिलेवर हल्ला करून तिला जागीच ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच कुकडहेटीचे क्षेत्र सहाय्यक बुल्ले यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदेवाही येथे नेण्यात आले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत गावला नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी वनविभागाच्या वतीने मृतकाच्या नातेवाईकांना तात्पुरती आर्थिक मदत देऊन शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत  लवकरच देण्यात येईल. असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!