संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
मान्यवरांची राहणार मुख्य उपस्थिती
बल्लारपूर : भारतीय राज्यघटना लागू झाल्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, बल्लारपूर पंचायत समिती व विसापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ( दि. १0 ) रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संगीतमय प्रबोधन कार्यक्रम अश्विनी रोशन या सादर करणार असून यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
. अमृतमहोत्सवी संविधान वर्षाचे औचित्य साधून शासनाने घर घर संविधान हा उपक्रम योजिले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी तथा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, सरपंच वर्षा कुळमेथे व अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. भारतीय राज्यघटनेचे महत्व ,घटनात्मक अधिकार,संविधान मूल्य भावी पिडीत रुजविण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
. सदर कार्यक्रमाला युवक मंडळ, शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.


