Home सामाजिक उमा वाघीणीची पर्यटकांना भुरळ

उमा वाघीणीची पर्यटकांना भुरळ

961

शेडेगाव (कॅम्प) गेट ला पसंती

प्रादेशिक वनविभागाचा यशस्वी उपक्रम

आशिष गजभिये

   चिमूर : तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या उमा नदी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका वाघिणीला उमा नदीवरून उमा असे नाव वाघिणीला पर्यटकांनी दिले असून ती अल्पावधीतच प्रसिद्धीस आली आहे. उमा वाघिण हमखास पर्यटकांना दिसते. जणूकाही उमाने पर्यटकांना भुरळच घातले आहे. त्यामुळे   शेडेगाव (कॅम्प) गेट ला पर्यटकांनी पसंती दिली आहे.

.       ब्रम्हपुरी वनविभागाने चिमूर वनपरिक्षेत्रात इको डेव्हलपमेंट समिती शिवापूर (बंदर) अंतर्गत सुरू केले असून याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हमखास व्याघ्र दर्शनाने पर्यटक आनंदी होत असून सतत गेट हाऊसफुल्ल चालत आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळाला असून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना याचा लाभ होत आहे.

.       वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिमूर (प्रादेशिक) अंतर्गत येत असलेलं हे वन पर्यटन क्षेत्र वन्यजीवांचा भ्रमण मार्ग आहे. जागतिक कीर्तीच्या ताडोबा अभयारण्य लगतच हे क्षेत्र उमरेड कराडला व पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वन्यजीवांच्या भ्रमण करण्याचे मार्ग आहेत. या ठिकाणी काही दिवसाूर्वीच प्रादेशिक वन विभागाने सफारी गेट सुरू केलं होत.

.       या गेटला उत्तम प्रतिसाद पर्यटकांकडून लाभत असून दररोज हाऊसफुल्ल चालत आहे.या ठिकाणी हमखास व्याघ्र दर्शन होत असून अनेक वन्यजीव बघावयास मिळत असल्याने या गेटची लोकप्रियता वन्य जिवप्रेमित झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी १४ पट्टेदार वाघ, ५बिबट, अस्वल, काळवीट, सांभर, नीलगाय असे अनेक प्राणी व दुर्मिळ पक्षी सुद्धा बघावयास मिळत आहेत.

.        बाली ,चांदणी,उमा, त्रिशूल असे अनेक नावे या ठीकानच्या वांघाणा पर्यटकांनी दिली आहेत.या मुळे या ठिकाणी वन्य पर्यटनामुळे  स्थानिक युवकांना रोजगार मिळाला असून अनेक सुशिक्षित तरुण या ठिकाणी मार्गदर्शक,जिप्सी चालक म्हणून कामावर लागले आहे.सोबत या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.बऱ्यापैकी या ठिकाणी रोजगार निर्मित झाले आहेत.

नदीतून बाहेर निघताच शांतता                                                                                                                                                          या प्रादेशिक वन पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना उमा वाघिणीचे हमखास दर्शन होत आहे.ती दुपारच्या वेळी नदी परिसरात थंड जागेत आराम करीत असते.जेव्हा ती झुडुपातून बाहेर निघते तेव्हा सगळीकडे स्मशानशांतता पसरते.अनेक पर्यटक तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात मग्न होतात.

ऑनलाईन प्रवेश सुरू होणार                                                                                                                                                                 या गेट वर सद्यस्थितीत जागेवरून प्रवेश देण्यात येत आहे.मार्गदर्शक व वाहन उपलब्ध आहेत.सकाळ सत्रात व दुपार सत्रात असा प्रवेश देण्यात येत असून लवकरच या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश सुरू करण्यात येणार आहे.                                                                                                                                                            किशोर देऊळकर,                                                     वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादे,),चिमूर.

error: Content is protected !!