भीषण आग

976

चंद्रपूर : चंद्रपूर नागपूर महामार्गांलगत असलेल्या नंदोरी येथील सोनटक्के यांच्या गोदाम परिसरात भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोदामकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने जी एम आर कंपनीच्या व भद्रावती येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच भद्रावती येथील अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ पोहचत आग आटोक्यात आणली, काही वेळाने जिमआर कंपनी चे अग्निशमन वाहन पोहचले. सोबतच वरोरा पोलीस स्टेशन अधिकारी आले होते.

.     यावेळी नरेंद्र जिवतोडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, तंटामुक्त अध्यक्ष अशितोष घाटे व गावकऱ्यांनी आग विझवायला मदत केली.

error: Content is protected !!