दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
चार जणांवर गुन्हा दाखल
कोरपना : कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावात कोंबडा झुंजीवर पैसे लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कोंबडा बाजारावर धाड टाकली यात २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी ४ आरोपींवर जुगार प्रतिबंधित कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
. जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच कोंबडा बाजारावर Such टाकली अचानक पडलेल्या धाडीने जुगार खेळणारे सैरावैरा पळू लागले मात्र यामधील अमोल साधूजी खरवडे,(40) संजय शालिक क्षीरसागर(29) राहणार कोरपना, अनिल किसन बेलेकर (54) राहणार यवतमाळ, राजेंद्र नानाजी खिरटकर (46) राहणार यवतमाळ हे पोलिसांच्या हाती लागले.
. आरोपींजवळून रोख रक्कम, ४ जिवंत कोंबडे, ४ मोटारसायकल सह एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.
. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतुर्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, पोलीस पथकातील कर्मचारी किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे व दिनेश अराडे यांनी केली.


