वरोरा : लोकमान्य महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आज शुक्रवार दि. 28 मार्च ला नाणेचित्र प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले.
. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.जयश्री शास्त्री होते तर उद्घाटक म्हणून लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरोरा चे प्राचार्य महेश डोंगरे, किसान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माढेळी चे प्राचार्य हेमंत कावठी हे उपस्थित होते.
. याप्रसंगी उद्घाटन पर भाषणात श्रीकांत पाटील यांनी इतिहासात नाण्यांचे महत्त्व विशद करून नाण्यांच्या माध्यमातून इतिहास कसा पुढे येतो हे समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना प्राचीन नाणी संग्रह करण्याचा सल्ला दिला. तर महेश डोंगरे व हेमंत कावटी यांनीही विद्यार्थ्यांना नाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयश्री शास्त्री यांनीही प्राचीन नाण्याचे महत्त्व समजावून सांगून परिसरातील नाणी संग्राहक यांची माहिती दिली.
. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. दीपक लोणकर यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र शेंडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


