Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही

अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही

1020

वरोरा : तालुक्यातील मौजा तुळाणा घाटातून अवैद्य रित्या रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वरोरा महसूल विभागाच्या पथकाने पकडत तहसील कार्यालय वरोरा येथे आणून जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही बुधवारी दि. 26 रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

.     वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य गौण खनिज उत्खननाला ऊत आला आहे. या अवैद्य उत्खननाविरोधात वरोरा महसूल विभागाने विशेष पथक निर्माण केले असून  अवैध  गौण  खनिज  वाहतूक व उत्खनन करणारे वाहनाविरुद्ध बळगा पुकारला आहे. बुधवारी मौजा तुळाना घाट येथे संदीप दाते रा. करंजी, अमोल परोधी रा.करंजी, किशोर चीपडे वरोरा यांच्या मालकीचे 3 ट्रॅक्टर 3 ब्रास रेतीची  अवैधरिता  वाहतूक  करतांना  जप्त  करून  तहसील कार्यालय वरोरा येथे जमा करण्यात आले.

.     सदर कार्यवाही तहसिलदार वरोरा यांचे मार्गदर्शनात विशेष पथकातील मंडळ अधिकारी रवींद्र गेडाम वरोरा, तलाठी गजानन सोयाम, आकाश राठोड, स्वप्निल तिकुडवे, अमोल इंगोले, महसूल सेवक नितूल हक्के यांनी केले.

error: Content is protected !!