Home चंद्रपुर जिल्हा विशेष युवतीला प्रपोज करने मजनूला पडले महागात

युवतीला प्रपोज करने मजनूला पडले महागात

1030

मजनू विरुद्ध पोलिसात तक्रार

नागभीड तालुक्यातील ढोरपा येथील घटना

नागभीड : गावातीलच एका अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिचा पाठलाग करून जबरदस्तीने प्रपोज करणार्‍या युवका विरोधात नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश अविनाश पाणसे (21) रा. ढोरपा असे मजनू युवकाचे नाव आहे.

.      सविस्तर असे की, आठ महिन्यापूर्वी आरोपी नितेश याने पीडित मुलीला घरासमोरील रस्त्यावर प्रपोज केला होता. परंतु पीडित युवतीने त्याला नकार दिला होता . तेव्हा पासून आरोपी नितेश  हा पीडितेला कॉलेजला जात असताना तिच्या कडे बघणे व पीडितेच्या मागे मागे जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु सदरची बाब पीडितेने घरच्यांना कोणालाही सांगितली नाही.

.      दिनांक 24/3/2025 ला पीडित मुलगी ही नियमित प्रमाणे सकाळी 11 वाजता पेपर असल्याने कॉलेज करिता गेली होती. दुपारी 1 वाजता पेपर सुटला व पीडित मुलगी ही घरी परत येत होती. तेव्हा कॉलेजचे समोर आरोपी रितेश अविनाश पाणसे हा आला आणी पीडितेला जिओ कंपनीचा प्रिपेड मोबाईल हातात देऊन त्या मोबाईल द्वारे त्यांचेशी पीडितेशी बोलण्याची इच्छा नसताना सुद्धा पीडित मुलीसोबत वयक्तिक परिचय वाढविण्याचा प्रयत्न केला. अखेर मजनूच्या त्रासाला कंटाळून युवतीने थेट पोलिस स्टेशन गाठत मजनू विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पो. स्टे. नागभीड येथे अप. क्र.116/2025 कलम 78 बीएनएस सह कलम 12 बा. लै.अ.सं.अधी. 2012 अन्वये मजनू नितेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.      सदर अपराधातील आरोपी रितेश अविनाश पाणसे रा. ढोरपा ता. नागभीड यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. निरीक्षक अनुराधा फुकट करीत आहेत.

error: Content is protected !!