वसतिगृहातील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण प्रकरण
चिमूर : तालुक्यातील बोथली येथील शिवाजी वरभे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेले समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला सोबतच राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणात उपाविभागीय अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले आहे. यात दोषींवर कोणती कारवाई होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. बोथली (वहा.) येथे समाजकल्यान विभागामार्फत संत गजानन मुलांचे वसतिगृह सुरू आहे. यात चोवीस विद्यार्थी चालू शैक्षणिक सत्रात आहे. यातील काही दहावी – बारावीची परीक्षा संपल्याने गावाकडे गेले. आता १४ विद्यार्थी राहत आहेत. येथील अधीक्षक नरेंद्र वरभे यांचा अपघात झाल्याने ते रजेवर आहे. यामुळे येथील विद्यार्थी रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. केवळ शिपायाच्या भरोशावर विद्यार्थ्यांना सोडल्या गेले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही. गुरुवारी शिपाई विलास हुलके हे आठवडी बाजारात साहित्य खरेदी करायला गेले होते. दरम्यान 12 वर्ष वयाच्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी मिळून काठी व बेल्ट च्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले. या गंभीर प्रकाराची माहिती वृत्तपत्रात झडकताच प्रशासनात खळबळ माजली आहे. या प्रकरणाची दखल चिमूर चे उपविभागीय अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. पालकांना बोलावून विद्यार्थ्यांचे बयान घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांचे दालनात विद्यार्थ्यांचे व कर्मचार्यांचे बयान नोंदविण्यात आले. या मारहान प्रकरणात नेमक दोषी कोण ? याची चौकशी केली जात आहे. या वसतिगृहाचे अधीक्षक मागील १३ मार्च पासून रजेवर आहेत.यात एक चौकीदार आणि एक स्वयंपाकी महिला आहे. दोघांच्या भरोशावर वस्तीगृहाचा कारभार चालत आहे. कधी कोणत्याही कामासाठी किंवा साहित्यासाठी शिपाई बाहेर जातो तेव्हा अधीक्षक हे वरोरा वरून ये-जा करतात. त्यात त्यांच्या गैरहजर असण्याच प्रमाण जास्तच आहे यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. समाज कल्याण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देत कायमस्वरूपी अधिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव या वसतिगृहातील झोपायचे बेड विद्यार्थी संख्या पेक्षा कमी आहेत.त्यांना दिलेले लॉकर पूर्णत खराब व मोडकडीस आले आहेत. गादया जीर्ण झालेल्या आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही हातपंपाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो.यातच आता वातावरणात उकाडा वाढलेला आहे. यामुळे इथे कुलर अभावी विद्यार्थी रात्री वसतिगृहाच्या छतावर झोपतात. विद्यार्थ्यांना आळी पाळी ने स्वतः सर्व परिसर व स्वतःच अंथरून पांघरून स्वच्छ करावे लागत आहे.या कडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


