Home सामाजिक नवव्या शिक्षण परिषदेत महिला शिक्षकांचा सन्मान

नवव्या शिक्षण परिषदेत महिला शिक्षकांचा सन्मान

1052

भद्रावती : नवव्या शिक्षण परिषदेचे औचित्य साधून तालुक्यातील ढोरवासा केंद्राने केंद्रातील गटशिक्षणाधिकारी डॉ प्रकाश महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता जपली.

.     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चारगाव येथे नवव्या शिक्षण परिषदेची यशस्वी सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष गीता रोहनकर शाळा व्यवस्थापन समिती, उदघाटक अध्यक्ष सुचिता बोबडे शाळा व्यवस्थापन समिती तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आकाश जुनघरे, उपसरपंच पांडुरंग वांढरे हे उपस्थित होते. या परिषदेच्या प्रास्ताविकेत गायकवाड यांनी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना निपुन कसे करता येईल, परिपाठात इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर केल्यास मुलांच्या ज्ञानात भर पडेल असे प्रतिपादन केले. महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांना एक समर्पक कवीला बहाल करताना गायकवाड म्हणाले की,

कोमल है तू कमजोर नही है,
शक्ती का नाम ही नारी है
जग को जीवन देने वाली
मौत भी तुझसे हारी है,

.      या गीताने वातावरण निर्मिती करून केंद्रातील तीन आदर्श शिक्षीकांना शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यात सुप्रिया कोडापे, संध्या भडके, ज्योती पारखी यांचा समावेश आहे.

.     सोबतच केंद्रातील सर्व महिला शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ व कर्तृत्ववान महिलांचे पुस्तक देऊन सन्मानित करून महिला दिनानिमित्त कृतज्ञता जपण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन मनीषा चन्नावार तर आभार प्रदर्शन वसंत जांभुळे यांनी केले.

error: Content is protected !!