भद्रावती महसूल विभागाचा कार्यवाहिचा बडगा
भद्रावती : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज विरोधात तहसीलदार भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथकाची निर्मिती करण्यात आली असून दररोज गौण खनिजाची अवैध वाहतूक करण्याऱ्या वाहनावर कारवाई बडगा उभारला असून शनिवारी दि. 8 रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
. तालुक्यातील कोकेवाडा, धानोली गावाजवळ ट्रॅक्टर क्र, एम एच29 टी सी4175 धानोली कोकेवाडा घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कोकेवाडा गावाजवळ गस्त घालीत ट्रॅक्टर पकडत शेगाव पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले सदर ट्रॅक्टर आशिष ज्ञानेश्वर खाडे रा. धानोली यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक मंडळ अधिकारी अनिल दडमल, तलाठी गोविंदा सेलोटे, तलाठी खुशाल मस्के, निर्दोष फुल बोगे, नितीन बुचुंडे कोतवाल यांनी केली.
. तर दुसऱ्या कारवाईत दिनांक 8, रोजी सकाळी साडेसात वाजता भद्रावती तालुक्यातील चपराळा येथे अवैद्य रेती भरून येत असलेल्या ट्रॅक्टरची गोपनीय माहिती मिळाली असता कारवाई करण्यात आली सदर ट्रॅक्टर देविदास गोसावी पाझारे रा. सुमठाणा यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 ए पी 50 25 असून ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालय येथे लावण्यात आला ही कारवाई भद्रावती तहशीलदार राजेशभांडारकर यांचे नेतृत्वात तलाठी विनोद चिकटे तलाठी अनिल गहूकर तलाठी गिरीश कोहळे कोतवाल संदीप रामटेके प्रकाश दुपारे व तलाठी अनिल मस्के यांनी केली.


