भद्रावती महसूल विभाग अॅक्शन मोडवर
भद्रावती : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू आहे. या रेती माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी भद्रावती महसूल विभाग अॅक्शन मोडवर असून अवैद्यरीत्या रेतीची वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले. दिनांक 4 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता मौजा कारेगाव येथे भरारी पथकाने कारवाई केली . या कारवाईने रेती तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
. भद्रावती तालुक्यामध्ये ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत आहे. दरम्यान दि. 4 ला महसूल विभागातील नायब तहसीलदार मनोज आकनुरवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत 1 ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई मंडळ अधिकारी समीर वाटेकर , भद्रावती आणि तलाठी दिनेश भिसीकर यांच्या सहकार्याने करण्यात आली
. सदर ट्रॅक्टर सुशांत काटेकर (रा. शेगाव बु.) यांच्या मालकीचा असून, चालक विलास शंकर डाखोरे (रा. शेगाव) असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर, दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 9:15 वाजता महसूल पथकाने पुन्हा एकदा कारवाई करत 1 ब्रास रेती भरलेला आणखी एक ट्रॅक्टर जप्त केला. सदर ट्रॅक्टरचा मालक तुळशीराम श्रीरामे, तर चालक विश्वास तुळशीराम श्रीरामे आहे. अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभाग सतर्क असून, जप्त केलेली वाहने आणि रेती पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आली आहेत.
भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी होतांना दिसत आहे यावर आळा घालण्यासाठी भद्रावती महसूल विभाग ऍक्शन मोडवर आला आहे. भद्रावती चे तहसीलदार भांडारकर यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे विशेष भरारी पथक तयार करण्यात आले. या भरारी पथकाचे माध्यमातून तालुक्यातील कानाकोपऱ्यात तस्करी करणाऱ्या वाहणावर कारवाईचा बडगा उभारल्याने गौण खनिजाची तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


