वरोरा : क्रिडा व युवक सेवा संचालनालय, (म. रा. ) पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या नेतृत्वाखाली, दिनांक 4 व 5 मार्च 2025 ला पवनी- जिल्हा भंडारा येथील या गांधी भवन ईथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय आष्टे-डू आखाडा स्पर्धेत वरोरा च्या फौजी वॉरिअर्स ग्रुप च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.
. यामध्ये 14 वर्ष वयोगटातील स्पर्धांमध्ये किरण गोचे व अवनी उमरे या दोन विद्यार्थ्यांनीनी गोल्ड मेडल तर आराध्या शंभरकर, भूमी टेमुर्डे, शौर्य कारेकार या तीन विदयार्थ्यांनी सिल्व्हर मेडल प्राप्त केलेले आहे. तसेच 17 वर्ष वयोगटातील स्पर्धांमध्ये शंतनु विजय धवने याने सिल्व्हर मेडल प्राप्त केले तर 19 वर्ष वयोगटात दुर्वाक्षी बुजाडे, रिया बावणे, वेदिका भोयर, शोन दसुडे हे चार विद्यार्थी सिल्वर मेडल चे मानकरी ठरले.
. फौजी वॉरिअर्स मार्शल आर्टस् व आष्टे-डू आखाडा ग्रुप चे खेळाडू सातत्याने वरोरा शहराचा गौरव केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सातत्याने वाढवीत आहेत
. वरोरा शहरातील सदभावना चौकातील इंदीरा गांधी शाळेच्या आवारात हे सर्व खेळाडू, विदयार्थी, बी. एस. एफ कमांडो प्रविण चिमुरकर, व्हेटरन डी. एन. खापने, रवी तुराणकर, गुरु राजु नकवे तसेच मुख्य प्रशिक्षक रवी चरुरकर, कोच घनश्याम खोंडे, अश्विनी नरड व फकीरा निखाडे यांच्या मार्गदर्शनात सातत्याने सराव करतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा चे पदाधिकारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच वरोरा नगरातील क्रिडा प्रेमी नागरिक यांचे अभिनंदनीय कौतुकाचा वर्षाव केला गेलाय.


