फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट वरोरा टिम च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
वरोरा : जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा व आष्टे-डू आखाडा असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने , नागपूर विभागीय शालेय आष्टे-डू क्रीडा स्पर्धा – २०२५ – २६ चे आयोजन दिनांक – २७ डिसेंबर २०२५ ला एरिगेशन, सिंचन हाँल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथे करण्यात आले होते.
. या स्पर्धेत महाराष्ट्र नागपूर विभागातील सर्व जिल्ह्य़ातील खेळाडूंचा सहभाग होता. या सर्व विभागीय खेळाडूंना मात देत, वरोरा येथील फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा च्या खालील शिवकालीन आष्टे-डू आखाडा खेळाडूंनी, १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील वयोगटात आपल्या उत्तम कौशल्याचे प्रदर्शन करून राज्य स्तरावरील स्पर्धामध्ये आपले स्थान पक्के केले.
. १४ वर्षाखालील वयोगटात – अर्णव निशांत कोसमकर, अवनी विनोद उमरे, आराध्या संजय शंभरकर, सर्व दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निग, वरोरा आणि हर्ष अनिल गेडाम, लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कूल, वरोरा ; १७ वर्षाखालील वयोगटात – शौर्य पवनकुमार कारेकार, दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निग आणि पियुष गजानन विंधाणे, लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कूल वरोरा तर १९ वर्षाखालील वयोगटात मानाचे मानकरी ठरलेत वेदीका गुणवंत भोयर, आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय व शोन जितेंद्र दसूडे, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा, तसेच स्पर्धा स्थळी फौजी वाॅरिअर्स मार्शल आर्ट सेंटर वरोरा चे मुख्य प्रशिक्षक रवींद्र चरूरकर आणि घनश्याम खोंडे यांनी खेळाडूंना कोच म्हणून योग्य मार्गदर्शन करून राज्य स्तरावर निवडीसाठी यथोचित प्रयत्न केले.
. विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत फौजी वॉरिअर्स चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनीं मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल विनय बोडे (अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक जुनसेई शोतोकन कराटे असोसिएशन,भारत) तसेच फौजी वॉरिअर्स मार्शल आर्ट सेंटर, वरोरा चे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण चिमुरकर (बी. एस. एफ.) समन्वयक, डी.एन. खापने सर (भा. वायू सेना), सचिव, रवि तुराणकर (भा. स्थल सेना), हेमराज बेहरे (मराठा रेजिमेंट), गुरुवर्य राजू नकवेजी आणि ,मास्टर वैभव खारकर, फकिरा निखाडे (कोच), अश्विनी नरड (कोच) तसेच शहरातील क्रिडाप्रेमी वर्ग, शिक्षक वर्ग आणि पालकवर्ग यांनी खेळाडूंच्या प्रशंसनीय कामगिरी चे कौतुक करून राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


