शेतकरी चिंतेत
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पत्राला केराची टोपली
नेरी : शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळावा हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांनी गळचेपी.होऊ नये म्हणून शासनाने सीसीआय मार्फत कापसाची खरेदी सुरू केली. याबाबत वेळोवेळी कापूस खरेदी केंद्रावर नियंत्रण व देखरेख ठेवणारी यंत्रणा बाजार समिती चिमूर यांनी जाहीर केले.
. यातच भारतीय कपास निगम लिमिटेड शाखा अकोला यांचं पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर मार्फतीने दिनांक 15 मार्च पर्यंत शासकीय सीसीआय ची नोंदणी व खरेदी सुरू राहील असे पत्र समाज माध्यमात प्रसारित झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र हा दिलास हा तात्पुरतं ठरला असून चौकशी केली असता कापूस खरेदी केंद्राकडून खरेदी बंद असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.
. सीसीआय च्या नोंदणी व खरेदीबाबत चौकशी केली असता कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद असून सुरू होईल किंवा नाही असे खरेदीं केंद्र प्रमुखाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने शासनाने तत्काळ सीसीआय कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


