मोटेगाव येथील घटना
नेरी : चिमुर तालुक्यातील मोटेगाव गावात मध्यरात्री बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या शेळी वर हल्ला करीत तिला फरफटत ओढत नेल्याची घटना दि. 3 ला सकाळी उघडकीस आली. सदर शेळी ही गुलाब पाठक यांच्या मालकीची होती.
. मोटेगाव परिसरात बिबट्याने नेहमीच धुमाकूळ घातला आहे अनेक प्राळीव प्राण्यांवर डल्ला मारला. या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट्याचा वावर नेहमीच असतो. नागरिकांना व शेतकऱ्यांना या दोघांचेही दर्शन होते यामुळे या परिसरात भीती निर्माण झाली आहे.
. सदर बिबट्याचा हल्ला मध्यरात्री असल्याचे बोलले जाते पहाटे बकरी मालक पाठक यांना बकरी नसल्याचे दिसताच आणि जागेवर हल्ल्याच्या खुणा पाहून त्यांना संशय आला समोर पाहतात तर शेळी मृत पडली होती तेव्हा वनविभागाला माहिती देण्यात येताच रासेकर क्षेत्रसहायक नेरी व पाटील वनरक्षक काजळसर यांनी घटनास्थळी हजेरी लावत बकरीचा पंचनामा करून वनविभागाला सुपृद केला सदर बकरी मालकाला नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.


