Home चंद्रपुर जिल्हा विशेष पोलीस स्टेशन समोरच मृतावस्थेत आढळून आले अभ्रक

पोलीस स्टेशन समोरच मृतावस्थेत आढळून आले अभ्रक

1101

मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके

चिमूर शहरात खळबळ

चिमूर : येथील पोलीस स्टेशन कार्यालयाच्या अगदी समोरील भागात पूर्ण दिवस झालेले एक अभ्रक रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या अभ्रकाच्या शरीराचे मोकाट कुत्रे लचके तोडताना नागरिकांनी बघताच मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून त्याला सोडविले. पूर्ण दिवस झालेले अभ्रक मृतावस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. हि घटना शनिवारी दि. 1 ला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

.     चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत दोन मोकाट कुत्रे एका बाळाचे मास खिचतांना काही नागरिकांना दिसलें. नागरिकानी थांबून कुत्र्यांना पळवून लावत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चिमूर पोलीस स्टेशन च्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अभ्रक ताब्यात घेतले. कुत्र्यांनी अक्षरशः त्या बाळाच्या पोटाचा भाग पूर्ण पणे खाऊन टाकला होता. पूर्ण वर्ष झालेल्या बाळाला पाहण्यासाठी. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. ऐन पोलीस स्टेशन च्या समोर अभ्रक कुणी आणून टाकले. याचा तपास चिमूर पोलीस कसून तपास करीत आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे व चिमूर पोलीस पथक करीत आहे.

error: Content is protected !!