Home सामाजिक नागपूर विभागातील ६ ग्रामपंचायत आदर्श महिला स्नेही

नागपूर विभागातील ६ ग्रामपंचायत आदर्श महिला स्नेही

1115

बल्लारपूर तालुक्यातील बामणी ( दुधोली ) चा समावेश

५ व ६ मार्चला पुणे येथे कार्यशाळा

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण विकासातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला स्नेही पंचायत म्हणून उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल नागपूर विभागातील ६ ग्रामपंचायतीची आदर्श महिला स्नेही निवड केली आहे. येथील सरपंच व ग्रामसेवक यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पुणे येथे यशदा मध्ये ५ व ६ मार्चला आयोजित केली आहे. हा सन्मान चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी ( दुधोली ) या एकमेव ग्रामपंचायत ला मिळाला आहे.

.    राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २0२४-२५ अंतर्गत आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झालेल्या सरपंच व ग्रामसेवक यांची दोन दिवसाची निवासी कार्यशाळा यशदा पुणे येथे ५ व ६ मार्च दरम्यान आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय कार्यशाळेत ग्रामीण विकासातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला स्नेही ग्रामपंचायत मध्ये कार्य व शाश्वत उपजिवीका यावर मार्गदर्शन होणार आहे.

.    राज्यस्तरीय कार्यशाळेत नागपूर विभागातील बामणी ( दुधोली ) ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील सरपंच प्रल्हाद आलाय,ग्रामसेवक लक्ष्मण शेंडे, वेळा ( हरिश्चंद्र ) ता.जि. नागपूर येथील सरपंच प्रिती इंगळे,ग्रामसेवक सचिन खोडे,शेडेपार ता.देवरी जि.गोंदिया येथील सरपंच ताराबाई गावड,ग्रामसेवक नितेश खोटेले,अरकतोंडी ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथील सरपंच विजय तुलावी,ग्रामसेवक कल्पना राऊत,बुरकोनी ता.हिंगणघाट जि.वर्धा येथील प्रशासक रविंद्र सुपारे,ग्रामसेवक निता बैलमारे आणि कटंगधरा ता.साकोली जि. भंडारा येथील सरपंच उशिका शेंडे, ग्रामसेवक महेश मडावी यांचे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत मध्ये कार्य केल्याबद्दल प्रशिक्षण होणार आहे. नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची यासाठी निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!