प्रवाशांना करावा लागतो विना तिकीट प्रवास
रेल्वे प्रशासनाचे दोन महिन्यापासून दुर्लक्ष
बल्लारपूर : मध्य रेल्वे अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानक आहे. येथे पॅसेंजर रेल्वेचा थांबा आहे. बल्लारपूर ते गोंदिया आणि बल्लारपूर ते वर्धा ये – जा करणाऱ्यांना येथील तिकीट घरातून प्रवासासाठी तिकीट मिळत होते. मात्र जानेवारी २0२५ पासून कंत्राटदारांनी तिकीट घर बंद केले आहे. परिणामी रेल्वे प्रवाशांना विना तिकीट प्रवास करावा लागत आहे. याकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रेल्वे प्रशासनाने विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावरील तिकीट घर सुरु करावे, असी आर्त हाक रेल्वे प्रवाशांनी दिली आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावरून दररोज गोंदिया ते बल्लारपूर व वर्धा ते बल्लारपूर दरम्यान पॅसेंजर रेल्वे धावते.यामुळे प्रवाशी संख्या देखील बऱ्यापैकी आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण दर्शवून मागील दोन महिन्यापासून येथील तिकीट विक्री थांबवली आहे. हा प्रकार रेल्वे प्रवाशांना संतापजनक आहे. परिणामी येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विना तिकीट रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे.
. विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर तिकीट विक्रीचे कंत्राट एका महिलेला दिले होते.मात्र त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर तिकीट विक्री आहे. या कारणास्तव तिकीट विक्रीचे कंत्राट सोडत असल्याचे फर्मान बल्लारपूर रेल्वे स्थानक अधिक्षक व मध्य रेल्वेचे वाणिज्य पर्यवेक्षक यांना दिले. परिणामी दोन महिन्यापासून येथून विना तिकीट रेल्वेचा प्रवास करत आहे.प्रवासादरम्यान विना तिकीट प्रवाशांकडून अधिकच दंड वसुल केला जात आहे. याचा आर्थिकभृदंड रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणाचा विनाकारण फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आग्रह मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.


