Home सामाजिक “शुभमंगल सावधान !” 21 दिव्यांग बांधव आज विवाह बंधनात

“शुभमंगल सावधान !” 21 दिव्यांग बांधव आज विवाह बंधनात

1085

चंद्रपूर : आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा व गौरव फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 मार्च 2024 रोजी गौरव सेलिब्रेशन लॉन चंद्रपूर येथे 21 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत आहे.

.       या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार समीर कुणावर, आमदार करण देवतळे, माजी नगराध्यक्ष,सुधीर कोठारी, नगरपरिषद, हिंगणघाट, माजी सभापती प्रकाश मुथा, जिल्हा परिषद, चंद्रपूर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी,धनंजय साळवे, ऍड जयंत ठाकरे,, वरोरा, जिल्हा चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

.      आस्था तर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिव्यांग उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन दिव्यांग बांधवांचे विवाह जोडण्याकरिता प्रयत्न करतात. दिव्यांगत्वावर मात करून यशस्वी जीवनाकरिता जीवनसाथी तेवढाच महत्त्वाचा असतो. दिव्यांगत्वापेक्षा क्षमतेच्या बळावर यशस्वी जीवन जगण्याचा तो सर्वात मोठा आधारस्तंभ असतो. याच आधारस्तंभाकरिता आस्था मागील 21 वर्षापासून प्रयत्न करत आहे. 21 वर्षात 450 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांचे विवाह जोडून सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांना विवाहबद्ध करण्याचे हे 22 वे वर्ष आहे. गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पुगलिया तथा संपूर्ण पुगलीया परिवार आस्थाच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या उभा आहे. प्रत्येक जोडप्याला रु. 50 हजार रुपये पर्यंत माहेरचा आहेर म्हणून साहित्य वितरण करण्यात येते, तसेच डेबू सावली चंद्रपूर वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष शिंदे प्रत्येक वधू करिता माहेरचे सोन्याचे मंगळसूत्र देतात. एक ना अनेक हात या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला लागतात. विवाहाच्या पहिल्या दिवशी सर्व वधू-वरांना हळद तथा मेहंदी लावण्यात येते. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पार पडल्या जाते.

.       ज्यामध्ये सर्व कलावंत स्वतः निस्वार्थपणे नृत्य व गीत गातात. या कार्यक्रमाचे सर्व अधिकार आस्था तथा गौरव फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांकडे असतो. त्याकरिता अध्यक्ष म्हणून श्रीमती आशादेवी बाठीया प्रमुख, अतिथी म्हणून श्रीमती श्वेता देवतळे, नगीना पुगलिया, आसावरी देवतळे, शीला धनंजय साळवे, . भारती शिंदे या उपस्थित होत्या. या सुरेल कार्यक्रमाची सुरुवात आवाजाच्या ध्वनी मनीषा पडगिलवार यांनी केली. चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकाली यांच्या दर्शनाने 21 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत आणि यशस्वी जीवनाची सुरुवात करणार आहेत.

.       कार्यक्रमाच्या संपन्नते साठी संजय पेचे, महेश भगत, विनोद भोयर, यशवंत देशमाने, रोहित पुगलिया, सुहास देवडे, आतिश अत्तेवार हे परिश्रमित आहेत. कार्यक्रमात जय बजरंग क्रीडा मंडळ बाबूपेठ यांचे कार्यकर्ते यांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करून कार्यक्रमाची सांगता करतात.

error: Content is protected !!